ब्रुनेईचे सुलतानाने मुलीच्या लग्नात पाण्यासारखा खर्च केला पैसा


प्रजासत्ताक दिनानिमित्त या वर्षी ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकिया भारताचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या आलीशान लाइफस्टाइलमुळे नेहमीच सुलतान बोलकिया चर्चेत असतात. जगभरातील माध्यमांची त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा हेडलाइन होती. आपल्या मुलीच्या लग्नावर त्यांनी तब्बल १२६ कोटी रुपये खर्च केले होते. जगभरातून २००० लोकांना निमंत्रण देऊन या लग्नासाठी बोलावण्यात आले होते.

हसनल बोलकिया यांची मुलगी हजह हफीजाचा विवाह सोहळा २०१२ मध्ये सोन्याने मढलेल्या भिंतींच्या स्वर्ण महल असलेल्या नुरूल इमान पॅलेसमध्ये पार पडला. शेजारील देशांच्या नेत्यांसह विविध देशांतून सेलिब्रिटीझला निमंत्रण देऊन या लग्नासाठी बोलावण्यात आले होते. सुलतान आणि त्यांच्या पत्नी सालेहा यांची हजह ही ५ वी कन्या आहे. हजह आणि तिचा पती (सुलतानचा जावई) सध्या सरकारी पदावर आहेत. सुलतानने आपल्या लाडक्या मुलीच्या विवाहावर १२६ कोटी रुपये पाण्यासारखे खर्च केले होते. सुलतानने प्रत्येक पाहुण्यावर सरासरी जवळपास १ लाख रुपये खर्च केले होते.

Leave a Comment