ब्रिटनचा हा ‘हॉट’ योग गुरू करतो वर्षातून एकदाच आंघोळ पण ती सुद्धा समुद्रात!


जगभर मागील आठवड्यात २४ जानेवारीला जागतिक सुर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. जगाला योगाची देन भारताने दिली आहे. तसेही योगाचे अनेक प्रकार आहेत. पण योग प्रकारातील सुर्यनमस्कार हा सर्वात मुख्य प्रकार मानला जातो. जगभरात अनेक योग गुरु आहेत. जे योगाचे महत्व लोकांना पटवून देतात. सोबतच ते लोकांना योगासुद्धा शिकवतात. त्यातील अनेक योग गुरु नग्न योगा करतात, तर कोणी सामान्य योगा करतात. ब्रिटनमध्ये असाच एक योग गुरु राहतो. स्टीवर्ट गिलक्रिस्ट असे त्याचे नाव असून हा योग गुरु ‘हॉट योगा’ शिकवतो.

‘टचिएस्ट-फीलिएस्ट’ नावाने प्रसिध्द असे ५४ वर्षांच्या स्टीवर्टचे एक योगा क्लास आहे. लोकांकडून येथे ९० मिनिटांचे योगासन करून घेतले जाते. स्टीवर्ट ब्रिटनच्या प्रिन्सचे नातेवाईक पिप्पा मिडलटन यांच्या संदर्भात सांगतो, ते जेव्हा कॅमडेन हाय स्ट्रीटवर भेटले तेव्हा मी त्यांना ओळखूच शकलो नाही. नंतर त्यांनी स्टीवर्टचा हॉट योगा क्लास जॉईन केला.

स्टीवर्ट म्हणतो, मी वर्षातून एकदाच आंघोळ करतो आणि ती सुध्दा समुद्रात करतो. समुद्रात आंघोळ केल्यामुळे महिनाभर त्याच्या शरीरातून दुर्गंध येत नाही. त्यानंतरच्या उर्वरित ११ महिन्याबाबत तो सांगतो की, अंगाचा दुर्गंध येत असला तरी लोकांना त्यातून काहीतरी आकर्षण निर्माण होते. त्याकडे प्रभावित होऊन लोक त्याच्या योगा शिकण्यासाठी येतात. स्टीवर्ट कधीच केस कापत नाही. मला चाकू आणि कात्रीशिवाय आयुष्य कसे असते, हे मला जाणून घ्यायचे आहे.

प्रसिध्द लोकसुद्धा योगा शिकण्यासाठी स्टीवर्टकडे येतात. त्यात ब्रिटनच्या प्रिन्सचे नातेवाईक पिप्पा मिडलटन, हॉलिवूड अभिनेता वुडी हारेलसन आणि केट मॉस यांच्यासह अनेक नावे सामील आहेत. ब्रिटनमध्ये सर्वात टची- फीलि योगा टीचरच्या रुपात योग गुरु स्टीवर्ट गिलक्रिस्ट ओळखला जातो. त्याचे केस लांब आहे. त्याच्या केसातून दुर्गंधीसुध्दा येते, तरीदेखील लोक त्याच्याकडे हॉट योगा शिकण्यासाठी येतात.

Loading RSS Feed

Leave a Comment