महाराष्ट्रात तरी बंद होणार नाही एअरसेल


नवी दिल्ली: ३० जानेवारी म्हणजेच आजपासून एअरसेल सिमकार्ड बंद होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून झळकत होत्या. पण एअरसेल महाराष्ट्रात तरी बंद होणार नाही. या पार्श्वभूमीवर एअरसेलने ग्राहकांना मेसेजद्वारे एअरसेल बंद होणार असल्याच्या बातम्या निराधार आहेत, त्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्टीकरण दिले आहे.

एअरसेलने महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश (पश्चिम) या राज्यातील परवाने परत केल्याचे म्हटले आहे. पण एअरसेल कस्टमर केअरशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित ग्राहकांच्या नंबरवर मेसेज करुन, एअरसेल बंद होणार नाही, असे स्पष्ट केले. एअरसेल बंद होणार असण्याच्या भीतीने ग्राहक पोर्टसाठी मेसेज करतात, त्यावेळी त्यांना असे मेसेज येत आहेत. त्यामुळे किमान महाराष्ट्र/मुंबईतील ग्राहकांना तरी दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment