या गावातील नागरिकाचे वार्षिक उत्पन्न आहे तब्बल ८८ लाख रूपये !


चीनमधील जियांगसू प्रॉविन्समधील वाक्शी गावाचे हे छायाचित्र असून. चीनचे ‘सुपर विलेज’ आणि जगातील सर्वात श्रीमंत गाव असे याला म्हटले जाते. येथील नागरिकांकडे आपले स्वत:चे घर, कार आणि भरपूर पैसा आहे. आज शेकडो कंपन्या शांघायपासून १३५ किमी दूर असलेल्या या गावात आहेत तसेच शेतीही येथे मोठ्या प्रमाणात केली जाते.

येथील प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पन्न वर्षे २०१४मध्ये ८८ लाख रुपये एवढे होते. विशेष म्हणजे हे गाव पहिल्यापासून श्रीमंत नव्हते. १९६१मध्ये हे गाव खूपच गरीब होते. एकी व्यक्तीने केलेल्या प्रयत्नामुळे या गावाची समृद्धी झाली. कम्युनिस्ट पार्टीचे लोकल सेक्रेटरी वू रेनबाओ यांनी या गावाच्या समृद्धी आराखडा बनवला व इंडस्ट्री आणली. कंपनीची स्थापना करून त्यांनी सामूहिक शेतीला प्रोत्साहन दिले.

ती कंपनी १९९०च्या दशकात लिस्टेड झाली आणि गावातील प्रत्येक व्यक्ती शेअर होल्डर बनला. येथे सध्या ७० पेक्षा अधिक कंपन्या असून येथील प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात सरासरी ६७ लाख रुपये जमा आहेत. २०१४ मध्ये लोहा, सिल्क, चिप मेकिंग आणि पर्यटनातून ६४ हजार कोटी रुपयांची कमाई या गावाने केली. गावातील बहुतेक घरे एकसारखीच आहेत. तसेच सर्व घरात १०-१० खोल्या आहेत. त्या जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला हॉटेलपेक्षा कमी वाटणार नाहीत. गावातील लोकांचे ८० टक्के उत्पन्न कराच्या रूपात जाते मात्र त्याबदल्यात अनेक मोफत सुविधा मिळतात. यात त्यांना लग्झरी विला, कार, हेल्थ केयर, फिरण्यासाठी हेलिकॉप्टर, लग्झरी हॉटेलात डिनर यासारख्या सुविधा मिळतात. गावात २० हजारांहून जास्त मजदूर काम करतात जे आसपासच्या गावातील लोक असतात.

Leave a Comment