वयाच्या ९० व्या वर्षीही विविध फॅशन ब्रॅण्ड्सला प्रमोट करतात ‘या’ आजीबाई


लंडनमधील ९० वर्षीय डेफनी सेल्फ या फॅशन मॉडेल जगातील सर्वात ओल्ड मॉडेल असून त्या आजही या क्षेत्रात काम करत आहेत. त्या आजही अनोख्या पद्धतीने श्रुंगार करतात. त्याचबरोबर त्या वयातही विविध फॅशन ब्रॅण्ड्सला प्रमोट करत आहेत.

तुम्हाला हे ऐकूण धक्काच बसेल की, १९४९ म्हणजे मागील ६९ वर्षांपासून डेफनी मॉडेलिंग करत असून त्यांना त्या काळात सुपर हॉट मॉडेल म्हणून ओळखले जात होते. उतरत्या वयात लोक स्वतःच्या सह्रीरामुळे कामामध्ये बदल करून स्वतःला कमजोर मानू लागतात परंतु डेफनी यांच्यानुसार वयाचा कामाशी काहीही संबंध नाही. डेफनी यांचा वृद्ध झाल्यामुळे कोणी मॉडेलिंग करू शकत नाही यावर अजिबात विश्वास नाही. डेफनी यांच्या मतानुसार, हा तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे.

काही दिवसांपूर्वीच एक ब्युटी प्रॉडक्ट ब्रँडचे डेफनी यांनी प्रमोशन केले. त्यांचा यासाठी एक व्हिडीओ शूट करण्यात आला आणि सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

Leave a Comment