जगात आहे असे एक गाव जेथे सर्व काही आहे अंडरग्राउंड


नुकतीच चीनमधील ४००० वर्षे जुन्या अंडरग्राउंड गावाची छायाचित्रे समोर आली असून या गावात अंडरग्राउंड १० हजार घरे असून १०० हून अधिक कोर्टयार्ड असलेल्या या गावात ३ हजार लोक आजही राहत आहेत. एकेकाळी २० लाख लोकांचे घर आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या या गावात होते. हे गाव आता पर्यटन नगरी म्हणून विकसित केले जात असून लवकरच येथील भुयारी मार्ग आणि अंडरग्राउंड वस्ती जगभरातील लोक पाहू शकतील.

चीनमधील या गावाला याओदोंग्स नावाने ओळखले जाते. सध्या या गावात ३ हजार लोक राहत आहेत. ज्यांच्या पिढ्या २०० वर्षांपासून येथे वास्तव्य करत आहेत. या घरांमध्ये आजच्या काळात मिळणाऱ्या बहुतांश घरातील सुविधा आहेत. यात वीजेसह उपकरणांचा देखील समावेश आहे. गावात लोकांचे राहणीमान सामान्य असले तरीही त्यांच्या घरात मॉडर्न सोयी सुविधा आहेत. येथील अनेक लोक आता दुसऱ्या शहरांमध्ये जाऊन वसले आहेत. अंडरग्राउंड घरांमध्ये वेगळे बाथरूम, सिटिंग रुम, बेडरुम आणि शेड इत्यादींसह विविध प्रकारच्या सोयी आहेत.

या घरांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्यावर भूकंपांचा काहीच परिणाम होत नाही. ४००० वर्षांपूर्वी बांधलेली ही घरे साउंड प्रूफ देखील आहेत. येथून बाहेरून आत आणि आतील आवाज बाहेर जात नाही. सोबतच थंडी आणि उन्हाळ्यातही या घरांचे तापमान नियंत्रित राहते. हे घर केवळ पावसाळाच नव्हे, तर पुरांपासून वाचण्यासाठी सुद्धा सक्षम आहेत. या घरांच्या भोवती बांधलेल्या मोठ्या भिंती पाऊस आणि पुरापासून संरक्षण करतात.

Leave a Comment