
मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार ई सर्व्हायव्हर दिल्लीत फेब्रुवारीत होत असलेल्या ऑटो एक्स्पो मध्ये शोकेस केली जात आहे. ही कंपनीची कन्सेप्ट एसयूव्ही ओपन टॉप ची टू सीटर कार आहे. केंद्र सरकारने २०३० पर्यंत सर्व वाहने इलेक्ट्रिक करण्याचा संकल्प केला आहे. त्या दृष्टीने मारुती सुझुकीची तयारी सुरु आहे. ई सर्व्हायव्हर चे तंत्रज्ञान सुझुकी व टोयाटो यांच्या भागीदारीतून केले जात आहे.
दिल्ली ऑटो शोमध्ये दिसणार मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कन्सेप्ट एसयूव्ही
या एसयुव्ही ला अल्ट्रा हाय ग्राउंड क्लिअरन्स दिला असून चाकेही मोठी आहेत. त्यामुळे या ऑफ रोडर वाहनाला वेगळच लुक आला आहे. या कारच्या वापरासाठी मारुती स्वतःचीच चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सेट करणार आहे, त्यासाठी विदेशी कंपनीची मदत घेतली जाणार नाही असेही समजते.
