लावाचा डिझाईन इन इंडिया प्राईम एक्स फोन लाँच


मोबाईल हँडसेट उद्योगातील प्रमुख बहुराष्ट्रीय कंपनी लावा इंटरनॅशनल लिमिटेड ने भारतासाठी एक महत्वपूर्ण पाउल टाकत पहिला डिझाईन इन इंडिया मोबाईल प्राईम एक्स नावाने लाँच केला आहे. हा फोन १४९९ रुपयात उपलब्ध असून दोन वर्षाच्या रिप्लेसमेंट वॉरंटी सह मिळणार आहे. या फोन ला १७ दिवसांचा बॅटरी स्टँड बाय टाईम दिला गेला आहे. कंपनीने त्याचा पहिला डिझाईन इन इंडिया स्मार्टफोन ऑक्टोबर २०१८ मध्ये सादर केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

यावेळी केंद्रीय कायदा व माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले सरकारने देशाला इलेक्ट्रोनिक उत्पादनात जागतिक केंद्र बनविण्याच्या उद्देशाने नीती आणि धोरणे आखली आहेत. डिझाईन इन इंडिया हे त्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाउल म्हणता येईल. गेल्या ३ वर्षात १०८ मोबाईल उत्पादक संस्था स्थापन करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे.

Leave a Comment