केएफसीकडून ड्रोन जिंकण्याची ऑफर


जिभेला पाणी आणणाऱ्या विविध चिकन डिशेसमुळे जगभरात लोकप्रिय बनलेल्या केएफसीने ग्राहकांसाठी ड्रोन जिंका ऑफर देऊन नवीन सेवेची सुरवात भारतात केली आहे. त्यासाठी ग्राहकांना दोन दिवसाची मुदत आहे. २५ व २६ जानेवारी या काळात केएफसी चे स्मोकी ग्रिल्ड विंग्स ऑर्डर करायचे आहेत. खरेदी नंतर लकी ड्रॉ काढला जाणार असून २४ विजेत्यांना केंटकी फ्लाइंग ऑब्जेक्ट नावाचे ड्रोन मोफत दिले जाणार आहे.

अर्थात ज्यांना असे मोफत ड्रोन मिळणार नाही त्यांनी निराश होण्याची गरज नाही कारण कंपनी त्याच्या वेबसाईटवरून केएफओ ड्रोन ची विक्रीही सुरु करत आहे. २५ जानेवारी पासून ही सेवा भारतात दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैद्राबाद, पुणे, कोलकाता, चंडीगड, कोची अशा दहा शहरात सुरु करत आहे. हे ड्रोन चटकन जोडता येते. ते कसे जोडायचे याचा व्हिडीओ आहे. अॅप च्या सहाय्याने या ड्रोन चे नियंत्रण करता येणार आहे.

Leave a Comment