जिओची प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भन्नाट ऑफर!


रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भन्नाट ऑफर आणली आहे. जिओच्या ग्राहकांना त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिकचा डाटा मिळणार आहे. कोणतेही अतिरिक्त शुल्क यासाठी ग्राहकांना भरावे लागणार नाही. ग्राहकांना नव्या ऑफरनुसार १ जीबी डाटाऐवजी १.५ जीबी डाटा आणि १.५ डाटा प्लान असणाऱ्यांना २ जीबी डाटा मिळणार आहे. एअरटेलने काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी नवीन डाटा प्लान आणला होता. आपला १ जीबी डाटा प्लान हा एअरटेलने १.४ जीबीचा केला होता. पण, आपला नवा प्लान लाँच करून जिओने एअरटेलला पुन्हा एकदा टक्कर दिली आहे. २६ जानेवारी २०१८ पासून जिओचा हा प्लान सुरू होणार आहे.

९८ रुपयांचा जिओचा सर्वात स्वस्त प्लान असणार आहे. तर ४९८ रुपयांचा सर्वात महागडा प्लान आहे. ग्राहकांना ९८ रुपयांच्या प्लान मध्ये २ जीबी डेटा २८ दिवसांसाठी वापरता येणार आहे. याव्यतिरिक्त जिओ युजर्सना फ्री अनलिमिटेड व्हॉइस कॉल, एसएमएस आणि जिओ सूट अॅप वापरण्याची मूभा देण्यात आली आहे. ग्राहकांना या प्रत्येक प्लानमध्ये पूर्वीपेक्षा अधिक डाटा मिळणार आहे. जिओने ५० टक्के अतिरिक्त डाटा देऊन ग्राहकांना प्रजासत्ताक दिनाची भेट दिली आहे.

Leave a Comment