स्पाईसजेट घडवणार केवळ ७६९ रुपयात देशांतर्गत विमान प्रवास


ग्राहकांसाठी ‘लो कॉस्ट’ प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या स्पाईसजेटने नवी ऑफर आणली असून देशांतर्गत वाहतुकीसाठी ‘स्पाईसजेट ग्रेट रिपब्लिक डे’ अंतर्गत ७६९ रुपये तर, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी २४६९ रुपयांपासून तिकीट दर आकारण्यात येणार आहे.

२२ ते २५ जानेवारी दरम्यान या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तिकिटांची बुकिंग करणे आवश्यक आहे. या दरम्यान काढलेल्या तिकिटांवर १२ डिसेंबरपर्यंत प्रवास करता येईल. या ऑफरचा लाभ स्पाईसजेटची वेबसाइट, अॅप, ट्रॅव्हल पोर्टल आणि बुकिंग एजंट यांमार्फत बुक करण्यात येणाऱ्या तिकिटांवरही घेता येणार आहे. त्यासाठी REP ६९ हा प्रोमो कोड वापरावा लागेल. केवळ एकेरी प्रवासासाठीच ही ऑफर लागू होणार असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, ही ऑफर ग्रुप बुकिंगवर लागू होणार नाही. ही ऑफर प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध आहे. या शिवाय मोबाइल अॅपवरून बुक करण्यात येणाऱ्या तिकिटांवर विशेष सवलतही मिळणार आहे.

Leave a Comment