
नवी दिल्ली : तुम्हाला जर बँकांचे व्यवहार करायचे असल्यास २५ जानेवारीपर्यंत उरकून घ्या अन्यथा पुढील तीन दिवस तुम्हाला बँकेचे व्यवहार करता येणार नाहीत. कारण सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे बँकेचे व्यवहार तुम्ही करु शकणार नाहीत तसेच एटीएममध्येही पैशांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. शुक्रवारी म्हणजेच २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असणार आहे. त्यानंतर महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील तर रविवारीही बँकांना सुट्टी असते.
सलग तीन दिवस राहणार बंद बँका
बँकांना सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने धनादेश वटण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. तसेच एटीएममध्येही पैशांची कमतरता भासण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला रोकड व्यवहार करायचा असेल तर २५ जानेवारीपर्यंत व्यवस्था करुन ठेवा अन्यथा व्यवहार करण्यात अडचण येण्याची शक्यता आहे.
