
स्वस्त टेरिफ प्लान बरोबर आता मोबाईल कंपन्यात स्वस्त फोन देण्याची स्पर्धा सुरु झालेली दिसत आहे. विवा व्ही १ ने ३४९ रुपयात फिचर फोन उपलब्ध केल्याला फार दिवस लोटले नाहीत तोच भारतीय मोबाईल युझर साठी ई कॉमर्स वेबसाईट शॉपक्यूज वर २४९ रुपयात आयकॉल के १ हा फिचर फोन मिळू लागला आहे. अर्थात या किमतील हा फोन ठराविक काळासाठी मिळू शकणार आहे.
२४९ रुपयात घ्या आयकॉल के ७१ फिचर फोन
या सिंगल सीम फोनला ८०० एमएएच ची बटरी, १.४ इंची मोनोक्रोम डिस्प्ले, एफएम रेडीओ, टोर्च, चार तासाचा टोकटाइम व २४ तास standby टाइम आहे.छोट्या शहरातील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन टो बनविला गेला आहे. वास्तविक हा फोन ३१५ रु. किमतीचा आहे मात्र टो २४९ रु.मिळविण्यासाठी flat ६६ नावाचे कुपन कोड घालावे लागेल व प्रीपेड ऑप्शन घ्यावा लागेल असे समजते. हा टू जी फोन आहे व १ वर्षाच्या वॉरटी सह मिळणार आहे. तो पिवळा, लाल, निळा व गडद निळा अश्या रंगात उपलब्ध आहे. फोन साठी ९९ रु. शिपिंग चार्ज द्यावा लागणार आहे.
