ऑनलाईन लॉटरी सुरु करणार महाराष्ट्र सरकार


सरकारी तिजोरीत भासत असलेली महसुली चणचण लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार एप्रिल पासून ऑनलाईन लॉटरी सुरु करण्याच्या विचारात असल्याचे मुख्य सचिव विजयकुमार गौतम यांनी सांगितले. ते म्हणाले या संदर्भातला प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. केरळ सरकारच्या ऑनलाईन लॉटरी चा अभ्यास करून हा प्रस्ताव तयार झाला आहे.

वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारची पेपर लॉटरी आहे. त्यातून सरकारला एकूण १३२ कोटींचा महसूल सध्या मिळत आहे. मात्र त्यातील १२५ कोटींचा महसूल अन्य राज्यांच्या लॉटरीवर वसूल केलेल्या करातून येतो. म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या पेपर लॉटरी तून येणारा महसूल फक्त ७ कोटी आहे. केरळ सरकार ऑनलाईन लॉटरीतून १३०० कोटींचा महसूल मिळवत आहे. सध्या ऑनलाईन लॉटरीची लोकप्रियता वाढती आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार ऑनलाईन लॉटरी सुरु करत असून ती एप्रिल पासून सुरु होईल असा अंदाज आहे.

Leave a Comment