युजेट- फोल्ड होणारी इलेक्ट्रिक स्कूटर


अमेरिकेच्या लास वेगास येथे सुरु असलेल्या कॅन्झ्युमर इलेक्ट्रोनिक शो मध्ये लाग्झाम्बर्गच्या कंपनीने सादर केलेली युजेट नावाची इलेक्ट्रिक स्कूटर सर्वांचे आकर्षण ठरली आहे. ही स्कूटर अवघी ३२ किलो वजनाची आहे व ती फोल्ड करून कुठेही नेता येते. एका चार्जमध्ये ७० किमी व १५० किमी अश्या दोन ऑप्शन मध्ये ती उपलब्ध आहे. ही स्कूटर बनविताना कार्बन फायबर चा वापर केला गेला आहे.

या स्कूटरला इको, नॉर्मल व स्पोर्ट असे तीन ड्रायविंग मोड आहेत. तसेच अडाप्टीव्ह एलईडी हेड लाईट, एलईडी ब्रेक लाईट व टेल लाईट दिले गेले आहेत. दोन बॉटरी ऑप्शन आहेत.एकात एका चार्ज मध्ये ७० किमी तर दुसरयात १५० किमी अंतर कापता येते. हि स्कूटर कमी वेळात चार्ज होतेच पण तिचा वापर पॉवर बँक सारखा करून अन्य उपकरणेही चार्ज करता येतात.

ही स्कूटर स्मार्टफोन ला कनेक्ट करून म्युझिक प्लेयर, थ्रीजी, जीपीएस, वायफाय, वापरता येते.२०१७ मध्ये तिचे उत्पादन सुरु झाले आहे. भारतात ७० किमी मॉडेल ६ लाखांना तर १५० किमी मॉडेल ७ लाख रुपयात मिळेल असे सांगितले जात आहे. प्रथम ही स्कूटर युरोप मध्ये विकली जाणार आहे व नंतर आशियाचा काही भागात व युएस मध्ये लौंच केली जाणार आहे.

Leave a Comment