ऑडीची नवी Q5 भारतीय बाजारपेठेत लॉन्च


नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत आपली बहुप्रतिक्षीत ऑडी Q5 लग्जरी कार निर्माता कंपन्यांपैकी एक असलेल्या ऑडीने लॉन्च केली आहे.

एसयूव्ही सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या ऑडी Q5 साठी बाजारात आपले वर्चस्व निर्माण करणे एवढे सोपे नसणार आहे. कारण, बीएमडब्ल्यू एक्स 3, मर्सिडीज बेंज जीएलसी, लेक्सस एनएक्स 300एच आणि वोल्वो एक्ससी 60 सारख्या एसयूव्ही गाड्यांसोबत या गाडीची स्पर्धा असणार आहे.

२.० लीटर डिझल इंजिन नव्या ऑडी Q5 मध्ये देण्यात आले आहे जे १९०PS ची पावर आणि ४०० एनएमचे टॉर्क जनरेट करते. ७ स्पीड ड्यूअल-क्लच गियरबॉक्ससोबत हे इंजिन देण्यात आलेले आहे. ऑडी Q5 चा टॉप स्पीड २१८ किमी प्रतितास असून गाडीला ० ते १०० किमी प्रतितासाचा वेग पकडण्यासाठी केवळ ७.१ सेकंदांचा अवधी लागतो. ही गाडी एका लीटरमध्ये १७.०१ किमीचा मायलेज देते.

आधीच्या ऑडी Q5 पेक्षा जास्त बदल नव्या ऑडी Q5 मध्ये करण्यात आलेले नाही. नव्या ऑडी Q5मध्ये दोन्ही बाजूला एलईडी हेडलॅम्प्स आणि पुढील बाजुला हेक्सागनल ग्रिल देण्यात आली आहे. नवी ऑडी Q5 ही थोडी लांब आणि रुंदही आहे. ७ इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रिन, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग युनिट सारख्या सुविधा या गाडीत देण्यात आल्या आहेत. या कारची एक्स शो रुम किंमत ५३.२५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment