प्रत्यक्ष कर भरणाऱ्यांच्या यादीत पुणे विभागाचा पहिला क्रमांक


पुणे : पुणे विभागाने प्रत्यक्ष कर भरणाऱ्यांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला असल्याची माहिती पुण्याचे मुख्य प्राप्तीकर अधिकारी ए.सी. शुक्ला यांनी दिली आहे.

एकट्या पुणे विभागाने २०१७-१८ या आर्थिक वर्षात बजेटच्या ७५.५ टक्के कर भरला आहे. एकट्या पुणे विभागातून १६ जानेवारीपर्यंत ३७ हजार ३१० कोटी रुपये प्रत्यक्ष कर म्हणून जमा करण्यात आले आहेत. हा कर भरणा मागील वर्षापेक्षा २३.९८ टक्के एवढा आहे. पुणे विभागाचा चालू आर्थिक वर्षात देशभरातील कर भरण्यामध्ये वाटा ४.४ टक्क्यांनी वाढून ५.५ टक्क्यांवर पोहोचल्याचे ए. सी. शुक्ला यांनी म्हटले आहे. पुणे विभाग सर्वाधिक कर भरणाऱ्या पहिल्या पाच विभागांमध्ये अव्वल ठरला आहे.

पुणे विभागात मुंबई आणि विदर्भातील ११ जिल्हे वगळून उर्वरित महाराष्ट्राचा समावेश होता. वेगळा कर क्षेत्र मुंबई आणि विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी आहे. याशिवाय पुणे विभागात कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कर भरण्यातही वाढ झाली. मागील वर्षाच्या ८०५२.२० कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा पुणे विभागात ९८४६.१६ कोटी रुपये कॉर्पोरेट टॅक्स जमा झाला आहे.

Leave a Comment