
नवी दिल्ली – भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) अध्यक्षपदी क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ के. शिवन यांची निवड झाली आहे. ‘रॉकेट मॅन’ या नावानेही के. शिवन यांना ओळखले जाते.
इस्त्रोच्या अध्यक्षपदी आयआयटी बॉम्बेच्या ‘रॉकेट मॅन’ची निवड
सध्या थिरुवअनंतपूरम येथील विक्रम साराभाई संशोधन केंद्राचे शिवन हे संचालक आहेत. त्यांच्यावर व्हेकल लाँचचा आराखडा आणि त्याला विकसित करण्याची जबाबदारी होती. के. शिवन इस्त्रोचे मावळते अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांच्याकडून कार्यभार स्वीकारतील. शिवन यांच्या निवडीवर आज निवड समिती मंडळाने शिक्कामोर्तब केले. आगामी काळात उपग्रह आणि रॉकेट लाँच करण्यासाठी इस्त्रो धोरणात्मक योजना तयार करत आहे. अशात शिवन यांची निवड योग्य मानली जात आहे.
आयआयटी बॉम्बेचे शिवन माजी विद्यार्थी असून शिवन याचे पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, आणि जीएसएलव्ही एके-३ चा उपग्रहवाहू व्हेईकलचा आराखडा तयार करण्यात योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. पीएसएलव्ही या रॉकेटवाहू व्हेईकलवरून आतापर्यंत १०४ उपग्रह अवकाशात सोडले गेले आहेत. याचे श्रेय शिवन यांना जाते.
