व्हिडिओकॉनचे शेकडो कर्मचारी १२ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर


औरंगाबाद – ८ जानेवारीपासून १२ दिवसांच्या सक्तीच्या सुटीवर चितेगावच्या व्हिडिओकॉन कंपनीतील शेकडो कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. कंपनी व्यवस्थापनाने सुट्या नेमक्या कशासाठी दिल्या याची अधिकृत माहिती दिली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे.

फ्रिज तसेच वॉशिंग मशीन, मोबाईल, एसी आणि इतर घरगुती उपकरणांची चितेगावातील व्हॅल्यू रेफ-१ व सोकेश-२ या युनिटमध्ये निर्मिती केली जाते. ६ हजार ४५९ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. नवीन वर्षाच्या आगमनाचे कारण सांगून २८ डिसेंबर ते ५ जानेवारी २०१८ पर्यंत दोन आठवड्यांपूर्वीच सुट्या देण्यात आल्या होत्या. प्रत्येक युनिटमध्ये ७ जानेवारी रोजी नोटीस लावून ८ ते १८ जानेवारीपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली. एवढी प्रदीर्घ सुटी सर्वांना देण्यामागचे नेमके कारण काय, याचा कोणताही उल्लेख नोटिसमध्ये नाही. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Comment