ट्विटरचे स्पष्टीकरण; यापुढे होणार नाही राजकीय नेत्यांचे ट्विटर खाते ‘ब्लॉक’


लंडन – ट्विटरने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगभरातील राजकीय नेत्यांना दिलासा दिला असून ब्रुस डेझील यांनी राजकीय नेत्यांचे ट्विटर खाते ब्लॉक करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण आपल्या ट्विटरवरुन जर कोणाची वैयक्तिक माहिती समोर आणल्यास, ती काढून घेण्यासाठी त्यांना ट्विटर निर्देश देईल, असेही डेझील यांनी म्हटले आहे.

उत्तर कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांच्या विधानाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटवरुन उत्तर दिले होते. आपल्या डेस्कवर कोरियापेक्षा मोठे न्युक्लिअर बटण असल्याचे ट्विट त्यांनी केले होते. त्यानंतर मोठ्या वादंगाला सुरुवात झाली होती. राजकीय नेत्यांनी केलेल्या ट्विटनंतर मोठ्या चर्चेला सुरुवात होते. यावरुन नेत्यांनी ट्विटवरुन केलेल्या विधानाचा राजकीय अन्वयार्थ तपासला जाईल. त्यात हिंसा उत्पन्न होईल किंवा ट्विटरच्या नियमांचा भंग केल्याचे आढळल्यास कारवाईचा विचार केला जाईल. तसेच, वापरकर्त्या नागरिकांच्या हिताचा विचार करुन ट्विटर तटस्थपणे भूमिका बजावेल, असे डेझील यांनी म्हटले आहे.

Leave a Comment