व्हॉट्सअॅपचा व्हॉईस कॉलवरुन व्हिडिओ कॉलवर स्वीच करण्याचा पर्याय उपलब्ध


मुंबई : सध्याच्या स्मार्टफोन यूझर्सचा दिवस व्हॉट्सअॅपशिवाय जात नाही, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. देशभरात सर्वाधिक वापरले जाणारे हे मेसेजिंग अॅप यूझर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स देत असते. व्हॉट्सअॅपने आता व्हॉईस कॉलवरुन व्हिडिओ कॉलवर स्वीच करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

व्हॉईस कॉल व्हॉट्सअॅपवर सुरु असताना व्हिडिओ कॉलवर तुम्हाला स्वीच करता येणार आहे. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीशी व्हॉईस कॉलवर बोलत असाल आणि त्याच्याशी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर बोलायची इच्छा असेल, तर तुमच्या स्क्रीनवर असलेले ‘क्वीक’ हे बटन क्लिक केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट समोरच्या यूझरला जाईल. ती रिक्वेस्ट त्याने स्वीकारल्यास तुमचा कॉल व्हॉईसवरुन व्हिडिओ कॉलवर स्वीच होईल.

पण यात कॉल उचलल्यावर व्हॉइस कॉल अचानक व्हिडिओ कॉलमध्ये स्वीच होणार नाही. समोरच्या व्यक्तीने रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली, तरच व्हिडिओ कॉल सुरु होऊ शकेल. हे अपडेट अँड्रॉईडच्या बीटा व्हर्जनवर पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅपकडून या नव्या फीचरची चाचपणी सुरु होती. सध्या फक्त बीटा २.१८.४ व्हर्जनसाठी ही सुविधा सुरु आहे. WABetaInfo ने याबाबत माहिती दिली आहे.

Leave a Comment