
प्रसिद्ध व सायकल क्षेत्रातील नामवंत हिरो सायकल्स मार्च अखेर त्यांच्या इलेक्ट्रीक सायकल्स भारतीय बाजारात आणत आहे. लेक्ट्रो या नावाने या सायकली बाजारात आणल्या जात असून त्यांची विविध २० मॉडेल्स बाजारात उतरविली जाणार असल्याचे समजते. त्याची सुरवात चार मॉडेल्सपासून केली जाणार आहे. या सायकलींच्या किंमती ४५ ते ८९ हजार रूपयांच्या दरम्यान असतील असेही सांगितले जात आहे.
हिरोची इलेक्ट्रीक सायकल लेक्ट्रो मार्च अखेर बाजारात
या सायकलींची बॅटरी ३ ते ४ तासात पूर्ण चार्ज होते व फुल चार्जवर ही सायकल ५० किमीचा प्रवास करू शकते. सायकलची स्पीड लिमिट आहे ताशी २५ किमी. लेक्ट्रो ब्रँडखाली सध्या चार इलेक्ट्रीक पेडल सायकली तयार केल्या गेल्या आहेत. या सायकली पेडल मारतानाच चार्ज होणार आहेत.
