
योगगुरू रामदेवबाबा व आचार्य बाळकृष्ण यांच्या पतंजली आयुर्वेदने एफएमसीजी क्षेत्रात मजबूत पाय रोवल्यानंतर आता ऑनलाईन बाजारात प्रवेशाची तयारी केली असल्याचे समजते. कंपनीचे प्रवक्ते तिजारीवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार पतंजली ई कॉमर्स क्षेत्रातील आठ बड्या कंपन्यांबरोबर सहकार्य करार करण्यासाठी चर्चा करत आहे.यात अमेझॉन व फ्लिपकार्ट या बड्या कंपन्यांचाही समावेश आहे.
पंतजली आयुर्वेद ऑनलाईन बाजारात प्रवेशासाठी सज्ज
गतवर्षात २६ डिसेंबरला पतंजली आयुर्वेदने आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी मुकाबला करण्यासाठी कंपनी डायपर्स आणि सॅनिटरी नॅपकिन्सच्या मार्केटवर लक्ष ठेवून असल्याची घोषणा केली होती. त्या पाठोपाठ आता ई कॉमर्स क्षेत्रावरही आपला ठसा उमटविण्याच्या प्रयत्नात पतंजली आहे.२०१७ च्या फोर्ब्सच्या सर्वाधिक वेगाने विकास केलेल्या कंपन्यांच्या यादीत पतंजलीने गतवर्षीच्या ४५ नंबरवरून १९ व्या नंबरवर प्रगती केली आहे. पतंजलीच्या व्यवसायवाढीने अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या धोरणात बदल करणे भाग पडले आहे.
