१ फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प


नवी दिल्ली : येत्या २९ जानेवारी ते ६ एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात नव्या वर्षातील (२०१८-१९) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. तर अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी दिली.

याबाबत माहिती देताना अनंतकुमार म्हणाले, दोन टप्प्यात यंदाचे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान पहिला टप्पा पार पडणार आहे. तर ५ मार्च ते ६ एप्रिल या काळात दुसरा टप्पा होईल. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करतील.

Leave a Comment