
मुंबई : हॅप्पी न्यू ईयर २०१८ ऑफर अंतर्गत रिलायन्स जिओने दोन प्रीपेड रिचार्ज प्लान लाँच केले असून यात एक प्लान १९९ रुपयांचा आणि २९९ रुपयांचा दुसरा प्लान आहे. जिओ १९९ रुपयांच्या प्लानमध्ये आपल्या ग्राहकांना दिवसाला १.२ जीबी डेटा देत आहे. २८ दिवसांची या प्लानची व्हॅलिडिटी आहे. तसेच यात अनलिमिटेड एसटीडी, लोकल व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे. यासोबतच एसएमएसही दिले जात आहेत.
हा प्लान आहे जिओचा सर्वात स्वस्त प्लान
महिन्याला ५६ जीबी डेटा जिओच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये दिला जात आहे. युजर्सला या ऑफरमध्ये दिवसाला २ जीबी डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधाही या प्लानमध्ये आहे.
जिओचे दोन नव्या प्लानशिवाय जुने प्लानही ग्राहकांसाठी सुरु ठेवण्यात आले आहेत. कंपनीच्या १४९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह ४ जीबी डेटा मिळत आहे तर ३९९, ४५९, ४९९ रुपयांचे प्लानही सुरु आहेत. या सर्व प्लानमध्ये दररोज एक जीबी डेटा मिळतो.
