नवी दिल्ली : लवकरच चलनात दहा रुपयांच्या नव्या नोटा आणल्या जातील, असे भारतीय रिझर्व्ह बँकने सांगितले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी सीरीजच्या या नव्या नोटा असतील. दहा रुपयांच्या १०० कोटी नोटांची छपाई यापूर्वीच रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आता दहा रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या जातील.
लवकरच चलनात येणार १० रुपयांच्या नव्या नोटा !
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून नोटाबंदीनंतर बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दोनशे, पन्नास रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. आता दहा रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या जात आहेत. दहा रुपयांच्या नव्या नोटा ब्राऊन कलरच्या असतील. तसेच या नोटांमध्ये सुरक्षा फिचर्स देण्यात आले आहे.
महात्मा गांधी सीरीजच्या दहा रुपयांच्या नव्या नोटा असतील. ब्राऊन कलरच्या या सर्व नोटा असतील. कोणार्क सूर्य मंदिरचे चित्र या सर्व नोटांवर असणार आहे. नव्या नोटांच्या नंबर पॅनेलच्या इन्सेटमध्ये इंग्रजीमध्ये ‘एल’ अक्षर लिहिण्यात आले आहे. नोटांच्या मागील बाजूस छपाई वर्ष २०१७ लिहिलेले असेल. त्यावर रिझर्व्ह बँकेच्या नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांचे हस्ताक्षर असणार आहे.