आता एटीएममध्ये देखील भेटणार २०० रूपयांच्या नोटा


नवी दिल्ली – २०० रूपयांच्या नव्या नोटांचा पुरवठा भारतीय रिझर्व्ह बँकेने वाढवला असून त्यांनी बँकांना यासाठी एटीएममध्ये बदल करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेच्या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी १ हजार कोटी रूपयांहून अधिक रूपये खर्च बँकिंग जगताला करावे लागण्याची शक्यता आहे. बँका सध्या बुडीत कर्जामुळे अडचणीत असून त्यांच्यावर त्याचवेळी या खर्चाचा आणखी भार पडणार आहे.

बँका आणि एटीएम उत्पादकांना लवकरात लवकर २०० रूपयांसाठी एटीएममध्ये बदल करण्यास रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे. २ हजार रूपयांच्या नोटेबरोबर २०० रूपयांच्या नोटेचेही आम्हाला आवश्यकता असून रिझर्व्ह बँकेचे हे चांगले पाऊल असून ही प्रणाली लागू करण्यासाठी ५ ते ६ महिने लागू शकतात, असे एका बँक अधिकाऱ्याने नाव सांगण्याच्या अटीवर ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला सांगितले आहे.

Leave a Comment