लवकरच ४ जीबीचा स्मार्टफोन लाँच करणार सॅमसंग


मुंबई : चायनीज स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी सॅमसंग इंडिया जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात नवा गॅलेक्सी ऑन लाँच करणार असून याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ हजारांच्या जवळपास या नव्या डिव्हाईसची किंमत असेल. दोन पर्यायांमध्ये गॅलेक्सी ऑन हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. दोघांमध्ये ४ जीबी रॅम कायम असणार आहे. अॅमेझॉन इंडियावर हा स्मार्टफोन उपलब्ध असेल.

सॅमसंग इंडियाने १६,९००रुपये किंमतीचा गॅलेक्सी ऑन मॅक्स २०१७मध्ये बाजारात आणला होता. यात रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सेल आणि एलईडी फ्लॅशसह फ्रंट कॅमेरा देण्यात आला होता. ५.७ इंचाचा एचडी डिस्प्ले कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी स्टोरेज या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहे.

Leave a Comment