
ऑकलंड : यंदा नववर्षाचे स्वागत करण्याची दोनदा संधी हवाईएन एअरलाईनच्या विमानाने प्रवास करणार्या प्रवाशांना मिळाली असून न्युझीलंडच्या ऑकलंडमधून HAL446 हे विमान २०१८मध्ये निघाले म्हणजेच रात्री ११.५५चे विमान १२.०५ ला निघाल्यामुळे २०१८ चे स्वागत करण्याची पहिली संधी त्यांना ऑकलंडमध्ये मिळाली. त्यानंतर हे विमान होनोलूलूला पोहचले तेव्हा तेथे ३१ डिसेंबरची सकाळ म्हणजेच १०.१६ वाजले होते.
२०१८ ला टेकऑफ आणि २०१७मध्ये लँडिंग
सुमारे २३ तासांचा फरक न्यूझीलंड आणि हवाईमध्ये पडतो. त्यामुळे विमान लॅन्ड झाले त्या संध्याकाळी प्रवाशांना पुन्हा नववर्ष सेलिब्रेट करण्याची संधी मिळाली आहे. जागतिक वेळेनुसार होनोलूलू हे GMT-10 तर ऑकलंड हे GMT+13 नुसार चालते. त्यामुळे त्यांच्या प्रवास वेळेत बदल आढळला.
