केस गळण्यावर मिळाली गोळी


कोणालाही टक्कल पडलेले आवडत नाही. मात्र वय वाढत चालले आणि पन्नाशीच्या जवळपास आलो की टक्कल पडल्याशिवाय रहातही नाही. उतरत्या वयातली ही सर्वात मोठी समस्या आहे. काही लोकांना तर तिशीतच टक्कल पडायला लागते. खरे तर टक्कल पडणे हा काही आजार नाही. पण माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा परिणाम होतो आणि टक्कल पडले की माणसाचा न्यूनगंड जागा होतो. म्हणून सर्वजण केसांची गळती थांबवणारे आणि गळती झाली असल्यास ते पूर्वीइतके वाढवणारे औषध किंवा तेल शोधत असतात. लोकांच्या या मानसिकतेचा विचार करून अनेक कंपन्यांनी अशी तेले बाजारात आणली असून हजारो रुपयांचा व्यापार केला आहे. अशा तेलांनी फार काही साध्य होत नाही. म्हणून हमखास गुण येणारे पण सोपे औषध मिळाले की लोकांच्या त्यावर उड्या पडतात.

अमेरिकेत सध्या अशाच एका गोळीने धूम माजवली आहे कारण या गोळीने केस गळायचे थांबतात असा अनुभव आलेला आहे. या गोळीचे नाव आहे न्युट्रॅलाईफ रिगेन. ही गोळी अजून अधिकृतपणे बाजारात आलेली नाही. तिला सरकारची परवानगी नाही. अमेरिकेत अशी गोळी वापरण्याची परवानगी मिळण्याआधी अनेक चाचण्यांतून जावे लागते. अशा चाचण्या सुरू असतानाच तिच्या क्लिनिकल चाचणीत तिची गुणवत्ता प्रकाशात आली आणि तिचा गवगवा झाला. चाचणीच्या या पातळीवरच ही गोळी वापरणार्‍या लोकांपैकी ९८ टक्के लोकांचे केस गळायचे थांबले. यशाची ही टक्केवारी लोकांना कळली आणि लोक आता प्रिस्क्रीप्शनशिवाय ही गोळी मिळवण्यासाठी धडपड करायला लागले आहेत.

लोेकांना या गोळीची खात्री होण्याचे मोठे कारण म्हणजे शास्त्रज्ञांनी या गोळीबाबत हमी दिली आहे. केस गळण्याच्या समस्येवरचे हे आजवरचे सर्वात परिणामकारक औषध असल्याचा निर्वाळा शास्त्रज्ञांनी दिला आहे. केस गळण्याची समस्या ही केसांच्या मुळाशी निगडित आहे. तिथे काही प्रथिने कमी पडतात आणि तिथल्या रक्तवाहिन्या क्षीण झाल्याने या केसांच्या मुळांना रक्तपुरवठाही कमी होतो परिणामे केस गळायला लागतात आणि बघता बघता माणूस टकलू होतो. आता चाचण्याच्या पातळीवर असलेली ही गोळी नेमकी रक्तपुरवठा वाढवते आणि केसांच्या मुळांना प्रथिनांचा पुरवठा करते. त्यामुळे काही आठवड्यांच्या आतच केस गळायचे थांबते आणि ते वाढायलाही लागतात. अशी हमी मिळाल्याने ही गोळी मिळवण्यासाठी झुंबड उडाली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment