तुम्हाला माहीत आहे का जिओचा सिक्रेट कोड?


टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये रिलायन्स जिओच्या एंट्रीनंतर धमाका झाला. आपल्या ग्राहकांसाठी जिओकडून दररोज नव्या ऑफर्स दिल्या जात आहेत. आता आपल्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओ एक सिक्रेट कोड घेऊन आले आहेत. हा सिक्रेट कोड जिओच्या ग्राहकांना चांगला फायद्याचा ठरू शकतो.

जर जिओ वापरणा-यांना नेटवर्कची अडचण नेहमी येत असेल. अनेक तक्रारीही त्याच्या केल्या असतील पण तरीही ग्राहकांचे समाधान होत नाही. कॉल ड्रॉप, फोन कनेक्ट होत नाही, मेसेज डिलिव्हर होत नाही यांसारख्या समस्या नेहमीच येतात. जिओने ग्राहकांसाठी एक असा कोड आणला आहे ज्यामुळे या समस्या भेडसावणार नाहीत.

*409* हा जिओ यूजर्ससाठी कोड असून हा एक स्पेशल कोड आहे. जिओ नंबरला याच्या मदतीने कोणत्याही दुस-या नंबरवर फॉरवर्ड केले जाऊ शकटे. म्हणजे नेटवर्कमध्ये तुम्ही असो किंवा नसो त्यामुळे तुमचा कोणताही कॉल मिस होणार नाही. नेटवर्क येत नसले तरी तुम्हाला जिओवर येणारे कॉल दुस-या नंबरवर येतील. पण तुम्हाला एक प्रोसेस यासाठी करावी लागेल.

यासाठी फोन डायलर तुम्हाला हा कोड डायल करावा लागेल. त्यानंतर ज्या नंबरवर कॉल फॉरवर्ड करायचा आहे, तो नंबर टाईप करा आणि डायल करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुमच्या जिओ नंबरवर कॉल लागत नसल्यास दुस-या नंबरवर कॉल येतील. जिओवर कॉल लागत नसल्याची समस्या याने येणार नाही. जर जिओ यूजर्सना आपली कॉल फॉरवर्डींगची सेवा बंद करायची असेल तर सोपी पद्धत आहे. तुम्हाला ही सेवा बंद करण्यासाठी *410 डायल करावा लागेल. यानंतर ही सेवा बंद होईल.

Leave a Comment