
भारतीय पर्यटकांना फक्त ३ तासांचा अवधी ‘ताजमहाल’ ही जगप्रसिद्ध वास्तू पाहण्यासाठी मिळणार असून केवळ ४० हजार पर्यटकांनाच या तीन तासांत ताजमहाल पाहता येणार आहे, हा नवा नियम २० जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे. हा निर्णय पर्यटकांची ताजमहाल पाहण्यासाठी होणारी वाढती गर्दी आणि सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आला आहे.
ताजमहाल पाहण्यासाठी भारतीय पर्यटकांसाठी नवा नियम
ताजमहाल पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. त्यामुळे ताजमहाल हा देखील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. पर्यटकांच्या संख्येवर येथे होणारी पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता मर्यादा आणण्यात आल्यामुळे दरदिवशी फक्त ४० हजार भारतीय पर्यटकच ताजमहालला भेट देऊ शकतात. पण हा नियम विदेशी पर्यटकांसाठी लागू करण्यात आलेला नाही.
