२००० हजारांनी स्वस्त झाला शाओमीचा MI Mix 2


नव्या वर्षाच्या निमित्ताने मोबाईल उत्पादक कंपनी शाओमीने ग्राहकांना गिफ्ट दिले असून कंपनीने आपल्या MI Mix 2 या प्रीमिअम स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. ऑफलाईन बाजारात हा फोन ३२ हजार ९९९ रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनचे ६जीबी रॅम आणि १२८जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट कंपनीने ३५ हजार ९९९ रुपयांमध्ये लाँच केला होता.

MI Mix 2मध्ये ५.९९ इंच आकाराचा क्वाडएचडी डिस्प्ले देण्यात आला असून ६ जीबी रॅम आणि १२८जीबी इंटर्नल स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर आणि १२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा (सोनी आयएमएक्स ३८६ सेंसर), ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन, ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा (फेशियल रिकॉग्निशन) देण्यात आला आहे.

Leave a Comment