दोन इटालियन भावांचा ‘अॅपल’ला झटका; मिळवला ‘स्टिव्ह जॉब्ज’ ट्रेडमार्क!


सॅन फ्रान्सिस्को : ‘अॅपल’ कंपनीला स्टिव्ह जॉब्स’ हे ‘ट्रेडमार्क’ नोंदवण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्याने मोठा झटका बसला आहे. आता तुम्ही ‘स्टिव्ह जॉब्स’ या इटालियन ब्रान्डच्या जीन्स, टी शर्ट, बॅग्स आणि इतर फॅशनेबल गोष्टी विकत घेऊ शकता.

याबाबत इटलीतील ‘ला रिपब्लिका’ वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, दोन इटालियन भाऊ जवळपास पाच वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर आपल्या कंपनीला ‘स्टिव्ह जॉब्स’ नाव देण्यात यशस्वी ठरले आहेत. २०१२ पासून ‘अॅपल’सोबत विन्सेन्झो आणि गियाकोमो बार्बेटो हे दोन भाऊ कायदेशीर लढाई लढत होते.

‘स्टिव्ह जॉब्स’ नावाचे ट्रेडमार्क ‘अॅपल’ने कधीच आपल्या नावावर नोंदवले नाही हे लक्षात आल्यानंतर याच नावाचे ट्रेडमार्क या दोन भावांनी आपल्या नावावर केले. अॅपलने यासाठी त्यांना धडा शिकवण्यासाठी न्यायालयात खेचले. न्यायालयात त्यांची हार झाली. अगोदर ‘स्टिव्ह जॉब्स’ हे नाव आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रिसाठी वापरायचे या दोन भावांनी ठरवले होते. पण आता ते हे नाव बॅग, जीन्स, टीशर्ट अशा गोष्टींसाठी वापरणार आहेत.या विशेष म्हणजे, ‘अॅपल’शी काहीही संबंध नसताना ‘स्टिव्ह जॉब्स’ या कंपनीचा लोगो ‘अॅपल’च्या लोगोशी सामर्म्य राखतो आहे.

Leave a Comment