२०१७मध्ये बंद झाल्या ‘या’ सात कार !


बऱ्याच मोठ्या आर्थिक घडामोडी २०१७ या वर्षात घडल्या. कार बाजारातही अनेक चढ-उतार या वर्षी पाहायला मिळाले. भारतात अनेक नव्या कार यंदा लाँच झाल्या. पण त्याचबरोबर काही कंपन्यांनी अनेक चर्चेत असलेल्या कारचे उत्पादनही बंद केले. भारतात चर्चेत असलेल्या तब्बल सात कार यंदा बंद करण्यात आल्या.

ह्युंदाई सेंटा फे – २०१० साली ह्युंदाईने सेंटा फे ही कार लाँच केली होती. या कारचे अपडेटेड व्हर्जनही २०१४साली लाँच करण्यात आले होते. तब्बल ३१.०७ लाख एवढी या कारची किंमत होती. पण नंतर या कारला कमी प्रतिसाद मिळत असल्याने ही कार बंद करण्याचा निर्णय यंदा ह्युंदाईने घेतला.

बीएमडब्ल्यू १ सीरीज – भारतीय बाजारात बीएमडब्ल्यू १-सीरीज ही कार चार वर्ष होती. पण या कारची किंमत जास्त असल्याने या कारला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या कारचे उत्पादन जानेवारी २०१७ मध्ये थांबवण्यात आले.

स्कोडा येती – भारतीय बाजारात तब्बल सात वर्ष असलेल्या स्कोडा येती ही कार मे २०१७मध्ये बंद करण्यात आली. या कारला छोटी साईज आणि जास्त किंमत यामुळे फारसा प्रतिसाद मिळत नव्हता.

मारुती सुझुकी रिट्झ – या वर्षी २००९साली लाँच करण्यात आलेली रिट्झ ही कार बंद करण्याचा निर्णय घेतला. या कारचे तब्बल ४ लाख युनिटची आतापर्यंत सुझुकीने विक्री केली होती. पण त्यांनी रिट्झ कार बंद करण्याचा निर्णय सुझुकी काही नवे मॉडेल बाजारात आणणार असल्याने घेतला.

ह्युंदाई आय १० – ह्युंदाई आय १० भारतात २००७ साली लाँच करण्यात आली होती. ही कार बरीच चर्चेतही होती. पण कंपनीने २०१३साली ग्रँण्ड आय १० लाँच केल्यानंतर आय १०च्या विक्रीत घट झाली. यावर्षी कंपनीने त्यामुळे आय १०ची विक्री बंद केली.

टाटा सफारी डायकोर – भारतीय बाजारात टाटा सफारी डायकोर तब्बल १९ वर्ष होती. १९९८ साली लाँच करण्यात आलेल्या या कारचे २०१२साली सफारी स्ट्रॉर्म या नावाने नवे व्हर्जन लाँच करण्यात आले. डायकोरच उत्पादन स्ट्रॉर्मची विक्री वाढवण्यासाठी बंद करण्याचा निर्णय टाटाने घेतला.

होंडा मोबिलियो – २०१४ साली होंडाने ७ सीटर मोबिलियो ही कार लाँच केली होती. या कारला सुरुवातीला मागणीही चांगली होती. पण काही कारणास्तव कंपनीने नंतर ही कार बंद करण्याचा निर्णय घेतला. या कारचे उत्पादन मार्च २०१७ पासून बंद करण्यात आले आहे.