ह्युंदाई नव्या फिचर्स आणि नावासह लॉन्च करणार नवी सॅन्ट्रो!


नवी दिल्ली : नव्या वर्षात आपली हॅचबॅक कार सॅन्ट्रोचे नवे मॉडेल प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर्स लॉन्च करण्याची शक्यता असून ह्युंदाई मोटर्स लहान कारची वाढती मागणी आणि व्यवसाय लक्षात घेऊन लहान कार्सवर आपले लक्ष केंद्रित करत असल्याचे बोलले जात आहे.

AH2 नावाने नव्या लॉन्चिंगसोबत ह्युंदाईच्या या लहानशा कारला ओळखले जात आहे. पण या कारचे भारतीय बाजारात लॉन्चिंगनंतर नाव सॅन्ट्रोच असणार आहे. या कारचे गेल्यावर्षी टेस्टिंग सुरु असताना दिल्लीतील रस्त्यावर पहायला मिळाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही कार पहायला मिळाली. ज्यावेळी ही कार रस्त्यावर पहायला मिळाली त्यावेळी ती पूर्णपणे कव्हर्ड होती.

या कारसंदर्भात कंपनीकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती न देण्यात आल्यामुळे या कारमध्ये कुठले फिचर्स असणार आहेत याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये. कारचा फोटो पाहून स्पष्ट आहे की, या कारचे उत्पादन शेवटच्या टप्प्यात असून सॅन्ट्रो कारचे टॉप मॉडल म्हणून या गाडीला मानले जात आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत २०१८मध्ये लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment