टीम कुक यांना तब्बल ६५४ कोटी रुपये वार्षिक पगार


२०१७ या आर्थिक वर्षामध्ये तब्बल ७४ टक्के इतका जास्त बोनस अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सीईओ टीम कुक यांना मिळाला आहे. उत्पन्न व निव्वळ नफा या दोन्ही गोष्टींमध्ये आयफोन बनवणाऱ्या अॅपल या कंपनीने चांगली कामगिरी केली असून या बोनसमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटले आहे.

निव्वळ पगार आणि बोनस असे दोन्ही मिळून कुक यांना एकूण वार्षिक मानधन १०२ दशलक्ष डॉलर्स किंवा ६५४ कोटी रुपये मिळाले आहे. अशीच भरभक्कम वाढ कुक यांच्यासह अन्य उच्चपदस्थांनाही मिळाली आहे. इक्विटीचा म्हणजे कंपनीच्या समभागाचा या मानधनामध्ये समावेश आहे. एस अँड पूर ५०० या निर्देशांकामध्ये असलेल्या अन्य स्पर्धक कंपन्यांपेक्षा चांगली कामगिरी कंपनीने केली तर अॅपलच्या अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ होते. गेल्या अनेक वर्षांचा अनुभव बघता, अन्य स्पर्धक कंपन्यांपेक्षा अॅपलची कामगिरी सरस होत असून या कंपनीचे अधिकारी जास्त मानधन घेत आहेत.

कुक यांनी अशीच चमकदार कामगिरी या आधी २०११ मध्येही केली होती. अॅपलने त्यावेळी एस अँड पूर ५०० या निर्देशांकामधील दोन तृतीयांश कंपन्यांना मागे टाकल्यामुळे ५,६०,००० शेअर्स कुक यांना विशेष बक्षीस म्हणून देण्यात आले.

Leave a Comment