कोण म्हणतो पैसे झाडाला लागत नाही; पण येथे झाडालाच पैसे ऊगवतात


कोण म्हणतो पैसे झाडाला लागत नाही, पण ब्रिटनमध्ये एक असे झाड आहे ज्यावर पैसेच पैसे उगवतात. आता तुम्ही विचार करत असाल कि हे कसे होऊ शकते, त्यासाठी तुम्हाला ही संपूर्ण बातमी वाचावी लागणार आहे.

ब्रिटनच्या स्कॉटिश हाईलॅंडच्या पीक झोन फॉरेस्टमध्ये एक झाड आहे ज्यावर नाणी चिकटलेली आहेत आणि हे झाड लावणारा माणूसच आहे. जेव्हा हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा ब्रिटनचे हे जंगल लोकांच्या नजरेत आले.

व्हायरल फोटोमध्ये, झाडांच्या मध्यभागी विविध देशांची नाणी आहेत. बरीचशी नाणी ब्रिटिश आहेत. हे झाड १७०० वर्षांचे आहे. या झाडावर अशी कोणतीही जागा नाही जिथे नाणी दिसू शकत नाहीत.

या झाडावर लावलेल्या नाण्यांचे कारण अतिशय विशेष आहे. या झाडाबद्दल अशी धारणा आहे की या झाडावर नाणी लावल्याने आपली इच्छा पूर्ण होते. येथे जोडपी या झाडावर नाणे लावतात, त्यामुळे त्याचे संबंध कित्येक वर्षांपर्यंत टिकते. येथे मोठ्या संख्येने परदेशी पर्यटकही येतात.

Leave a Comment