सुदर्शन पटनायक यांनी सांताची मोठी वाळू कलाकृती बनविल्याचा केला दावा


भुवनेश्वर: सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरीच्या समुद्रकिना-यावर ख्रिसमसच्या एक दिवस आधी सांताची प्रतिकृती तयार केली. पटनायक म्हणतात की, त्यांनी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला ओरिसातील पुरी समुद्र किना-यावर जगातील सर्वात मोठा सांताचा चेहरा बनवला आहे. त्यावर जागतिक शांतीचा संदेश लिहिला आहे.


पटनायक यांनी दावा केला की त्यांनी सांताला २५ फूट उंच व ५० फूट रूंद असा त्याचा चेहरा बनवला आहे. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये त्यांचे लक्ष्य आहे. जगप्रसिद्ध वाळूशिल्पकाराला सुदर्शन सँड आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ पुरीमधील ४० लोकांनी हे वाळू शिल्प बनवण्यात मदत केली. हे वाळूशिल्प बनवण्यासाठी ३५ तास लागले. पटनायक म्हणाले की, हे वाळूशिल्प लोकांना बघण्यासाठी एक जानेवारीपर्यंत ठेवण्यात येईल.

Leave a Comment