जिओनीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये वापरा तीन व्हॉट्सअॅप


मुंबई : आपल्या ग्राहकांसाठी नव्या वर्षात जिओनी कंपनी बजेट फोन घेऊन आली असून या फोनचे नाव ‘जिओनी S10 लाईट’ असे असून नुकताच हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनचे वैशिष्टय म्हणजे फ्लॅशसोबत १६ मेगापिक्सेल असलेला फ्रंट कॅमेरा. त्यामुळे सेल्फीप्रेमींसाठी आधीपासूनच एक उत्तम पर्याय म्हणून या स्मार्टफोनची उत्सुकता होती.

व्हॉट्सअॅप क्लोन फीचर या स्मार्टफोनमध्ये देण्यात आल्याने, एकाचवेळी तीन व्हॉट्सअॅप अकाऊंट ऑपरेट करणे शक्य होणार आहे. १५ हजार ९९९ रुपये किंमत असलेला ‘जिओनी S10 लाईट’ स्मार्टफोन आजपासून विक्रीसाठी बाजारात दाखल होणार आहे. या स्मार्टफोनचे मॉडेल सोनेरी आणि काळ्या रंगांमध्ये उपलब्ध असतील.

‘जिओनी S10 लाईटमध्ये ड्युअल नॅनो सिम स्लॉट, अँड्रॉईड ७.१ नुगा सपोर्टिव्ह (एमिगो ४.० यूआय) ऑपरेटिंग सिस्टम, ५.२ इंचाची स्क्रीन जिचे रिझॉल्युशन ७२०x१२८० पिक्सेल एवढे आहे. ४GHz स्नॅपड्रॅगन ४२७ प्रोसेसर, ४ जीबी रॅम , १३ मेगापिक्सेल रिअर सेन्सर कॅमेरा, १६ मेगापिक्सेल फ्लॅशसोबत फ्रंट कॅमेरा, ३२ जीबी स्टोरेज, २५६ जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा, होम बटनवर फिंगरप्रिंट सेन्सर, ३१०० mAh क्षमतेची बॅटरी याफोनसोबत देण्यात आली आहे.

Leave a Comment