आता फेसबुकच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे बुकिंग


मुंबई : केवळ सोशल मीडियाला आणि मोबाईलला सध्याची तरूण मंडळी चिकटून बसले असल्याचा आरोप सर्रास केला जातो. सोशल मीडियावर अनेकजण टीका करतात. पण स्मार्टली सोशल मीडियाचा वापर केल्यास अनेक गोष्टींची उत्तर आणि महत्त्वाची कामेदेखील अगदी चुटकीसरशी पूर्ण होऊ शकतात.

सोशल मीडियाच्या म्हणजेच फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून आता तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकणार आहात. गॅस सिलेंडरची बुकिंग करण्याची सुविधा इंडियन ऑयल कार्पोरेशन (IOCL)च्या ऑफिशिएअल पेजवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिलेंडर बुकिंगसोबतच फेसबुकवर तीन हिस्ट्रीदेखील पाहू शकणार आहात. ही सुविधा गॅस सिलेंडर बुकिंग आणि डिलेव्हरी या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा उपभोग देशभरातील ११.५० करोड नागरिक घेऊ शकणार आहेत.

गॅस सिलेंडर फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून बुक करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या फेसबुक अकाऊंटवर लॉगिंग करावे लागणार आहे. त्यानंतर इंडियन ऑयल कार्पोरेशन लिमिटेडचे ऑफिशियल पेज (@indianoilcorplimited)ओपन करा. या पेजवर उजव्या कोपर्‍यात BOOK NOWचे बटण देण्यात आले आहे. त्यावर क्लिक करा. त्यानंतर नवे पेज ओपन होईल. नव्या पेजवर कन्टिन्यू या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर एलपीजी आय डी क्रमांक मागितला जाईल. एलपीजी आय डी क्रमांक दिल्यानंतर बुक नाऊचा ऑप्शन दिला जाईल. बुकिंग झाल्यानंतर त्याचं कन्फरमेशन मोबाईलवर दिले जाईल.

Leave a Comment