आधार क्रमांकाचा गैरवापर प्रकरणावरुन ‘एअरटेल’च्या सीईओचा राजीनामा


नवी दिल्ली- आधार क्रमांकाचा गैरवापर प्रकरणावरुन एअरटेल पेमेंट बँकेचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक शशी अरोरा यांनी राजीनामा दिला आहे.

इंडियन युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (यूआयडीएआय) ने १६ डिसेंबरला कंपनीच्या ई-केवायसी परवान्याला तात्पुरते निलंबित केले आहे. एअरटेल आणि एअरटेल पेमेंट्स या दोन्ही बँकांचा परवाना यूआयडीएआयने निलंबित केला होता, पण प्राधिकरणाने गुरुवारी काही अटींनुसार १० जानेवारीपर्यंत एअरटेला ई-केवायसीच्या पडताळणीसाठी मान्यता दिली आहे. पण पेमेंट्स बँकेचा ई-केवायसी पडताळणीचा परवाना अजुनपर्यंत निलंबित करण्यात आला आहे.

शशी अरोरा यांनी २००६ पासून पेमेंट बँकेचे नेतृत्व केले आहे. त्यावेळीपासून ते कंपनीत कार्यरत आहेत. एअरटेलसाठी त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. कंपनीच्या विकासामध्ये त्यांनी लक्षणीय योगदान दिल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या डीटीएच व्यवसायाला त्यांनी मजबूत केले आहे. शशी अरोरा यांनी आता कंपनी सोडली आहे. त्यांना आम्ही त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो, असे देखील कंपनीने म्हटले आहे.

Leave a Comment