या ट्रिकने डिलीट करा गूगलकडे असलेली आपली माहिती


इंटरनेट विश्वातली जायंट सर्च इंजिन ‘गूगल’कडे तुम्ही काय ‘सर्च’ करता, तुमचा आवडता पदार्थ कोणता, तुम्ही कुठे कुठे जाता, कोणत्या वेबसाईटना भेट देता, याची सर्व माहिती असते. हे खरे आहे… जगातील सगळ्यात लोकप्रिय सर्च इंजिनकडे तुमची सर्वच माहिती आहे, तुमच्या प्रत्येक क्षणाची, तुम्ही एकटे राहात असाल, तरीही… गूगलच्या अटी आणि शर्तीच्या भल्या मोठ्या करारनाम्यात गूगलची सेवा वापरताना मिळत असलेल्या तुमच्या माहितीविषयी आमच्यावर विश्वास ठेवा, असे पहिले वाक्य आहे.

पण आता तुम्हाला हे माहीत आहे का, गूगलने ही जमा केलेली सर्व माहिती नष्ट करण्याची व्यवस्थाही ‘गूगल’नेच करून दिली आहे. गूगलच्या ‘My activity’मध्ये साठवलेली सगळी माहिती नष्ट करण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. त्यासाठी तुम्हाला आम्ही आज काही ट्रिक सांगणार आहोत.

आपल्या गूगल खात्याशी आपण करत असलेला प्रत्येक गूगल सर्च जोडला जातो. त्याचबरोबर आपली गूगलवर सुरू असलेली प्रत्येक हालचाल टिपली जाते, मग ते जीमेलवर पाहिलेला एखादा ईमेल असो वा गूगल फॉर्म्समध्ये भरलेला एखादा फॉर्म असो. ‘My Activity’ नावाच्या फोल्डरमध्ये ती सगळी माहिती जमा होते आणि तिथूनच ती डिलीट करता येते. तारीखवार माहिती शोधण्याचाही पर्याय त्यात देण्यात आहे. या फोल्डरमधली सगळीच माहिती तुम्ही नष्ट करू शकता किंवा एखादी विशिष्ट माहिती शोधूनही काढून टाकू शकता.

“All products” आणि “All time” हे पर्यायही माहिती नष्ट करण्यासाठी आहेतच. हे पर्याय निवडताच, त्याचे काय काय परिणाम होतील, हे सांगणारा एक इशारा गूगलकडून तुमच्या स्क्रिनवर झळकेल. प्रत्यक्षात, गूगलमधील तुमच्या शोधाचा इतिहास, म्हणजेच सर्च हिस्ट्री किंवा गूगलवरील तुमच्या भटकंतीची माहिती अर्थात ब्राउझिंग हिस्ट्री डिलीट केल्याचे कोणतेही परिणाम आपल्या गूगल खात्यावर किंवा त्या अॅप्लिकेशनवर होत नाही.

जगातील सर्वांत मोठी व्हिडीओ स्ट्रीमिंग साईट म्हणजे युट्यूब. आता युट्युबवर जगातील कुठलाही लोकप्रिय व्हिडीओ तिथेच सापडतो, आपल्याला तो फक्त तेवढा शोधावा लागतो. गूगलचे आपण यूट्यूबवर काय शोधतो आणि काय बघतो त्यावरही लक्ष असते. पण ती माहितीही डिलीट करता येते. यूट्यूबमध्ये डाव्या हाताला असलेल्या मेनूमधील हिस्ट्रीवर क्लिक करा. त्यातील Clear all search history आणि Clear watch history हे पर्याय निवडा.

आपली सगळी माहिती गूगल साठवून ठेवते, पण आपण वावरत असलेल्या वेबसाइट्सवर त्या माहितीच्या आधारे जाहिरातीही दाखवते. म्हणजेच आपण त्यांच्या सेवा वेबसाईटवर येणाऱ्या अॅड काय शोधले, पाहिले किंवा केले, यावरून ठरवण्यात येतात. म्हणूनच आपण केलेल्या सर्च किंवा ब्राउझिंगशी मिळत्या जुळत्या जाहिराती आपल्याला दिसू लागतात. पण काळजी करू नका! नेमकी कोणती माहिती जाहिरातदारांना गूगलने दिली, हे आपण शोधू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल खात्यात लॉग इन करून Personal info & privacy या मेनूत जावे लागेल. तिथे गेलेल्या Ads Settingsचा पर्याय निवडा आणि त्यात Manage ads settingsमध्ये जाऊन त्यात, Ads personalisation हा पर्याय दिसेल. तो जर Deactivate किंवा निष्क्रीय केल्यानंतर आपल्या इंटरनेट ब्राउझिंगवर आधारित जाहिराती थांबतील. त्यावेळी गुगल तुम्हाला तसे करणे हे तुमच्या हिताचे नसल्याचे सांगेल. त्यामुळे आपल्याला तशा जाहिराती हव्यात का, हे ठरवून मगच निर्णय घ्यावा. पण जाहिरातच नको, असा पर्याय मात्र गूगलने दिलेला नाही.

जर अँड्रॉईड फोन तुम्ही वापरत असाल तर गूगल आपल्या लोकेशनची म्हणजेच आपण कुठे गेलो, याची माहितीही साठवून ठेवते. गूगल मॅपवरची ही माहिती डिलीट करण्यासाठी त्या पेजवर गेल्यावर लोकेशन ट्रॅकिंगचे बटण बंद करायचे. तसेच, सगळी किंवा विशिष्ट माहिती डिलीट करायची. त्यासाठी Waste basket हा पर्याय निवडून एखादा विशिष्ट प्रवास किंवा थांबा काढून नष्ट करता येतो.

Leave a Comment