
दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी व्होडाफोन आणि आयटेल या दोन कंपन्यानी एकत्र येत नवा ४जी स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आणला आहेत. या स्मार्टफोनचे ‘A२०’ असे नाव असून, जिओ फोन आणि एअरटेल इंटेक्स अॅक्वा लायन्स N1 या स्मार्टफोनच्या किंमतींएवढी याची किंमत आहे.
व्होडाफोनने आणला १५९० रुपयात स्मार्टफोन
या स्मार्टफोनचे फीचर्सही आकर्षक असून एक जीबी रॅम आणि 4 इंचाचा WVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. ३६९० रुपये ऐवढी ‘A२०’ स्मार्टफोनची मूळ किंमत असून ही पूर्ण किंमत मोबाईल खरेदी करण्यावेळी द्यावी लागेल. मात्र यावर २१०० रुपयांचे कॅशबॅक आहे. पण मोबाईल खरेदी केल्याच्या १८ महिन्यांच्या अंतराने कॅशबॅकची रक्कम मिळेल. म्हणजेच १८ महिन्यांनी ९०० रुपये, त्यानंतरच्या १८ महिन्यांनी १२०० रुपये मिळणार आहेत. त्यामुळे हा स्मार्टफोन तुम्हाला १५९० रुपयांना पडतो.
प्रत्येक महिन्याला या स्मार्टफोनसाठी १५० रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. ३६ महिने हे रिचार्ज करावे लागेल. ज्यांना शक्य आहे, ते ३६ महिन्यांचे रिचार्ज आधीच एकत्रित करु शकतात. म्हणजे एकत्रित रिचार्ज केल्यास ५४०० रुपये भरावे लागतील. ३१ मार्च २०१८ पर्यंत या स्मार्टफोनसाठीच्या या सर्व ऑफर उपलब्ध असतील.
