बीटकॉईनमध्ये अडीच लाखाची गुंतवणूक करून बिग बींनी कमावले एवढे करोड रुपये


नवी दिल्ली: बीटकॉईन विकत घेण्यासाठी अनेक अब्जाधीश लाईन उभे आहेत. प्रत्येकाला हा नाणे खरेदी करायचे आहे. यामध्ये ब-याच लोकांनी गुंतवणूक केली आहे. यात बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चनचे नाव देखील समाविष्ट आहे. याबाबत बिजनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार बच्चन कुटुंबियांनी बीटकॉईनमध्ये अडीच लाख डॉलर (१ कोटी ६० लाख रुपये ) मेरीडियन टेक पीटीईमध्ये गुंतवणूक केली होती. अडीच वर्षात या बीटकॉईनची किंमत १७.५ मिलियन डॉलर (११२ कोटी रु.) झाली आहे.

बिजनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार २०१५ मध्ये, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी मेरिडियन टेक पीटीईमध्ये अडीच लाख डॉलर्सची (१.५७ कोटी रु.) गुंतवणूक केली होती. या फर्मचे नशीब तेव्हा बदलले जेव्हा परदेशी कंपनी लॉंगफिन कॉर्प यांनी मेडिदियनची मुख्य मालमत्ता झिडु कॉम विकत घेतली. जेव्हा त्यांनी झिडु डॉट कॉममध्ये गुंतवणूक केली, तेव्हा तिथे क्लाउड स्टोरेज आणि इ-वितरणचे स्टार्टअप होते.

याबाबत माहिती देताना मेरीडियन टेकचे संस्थापक वेंकट श्रीनिवास मीनावली यांनी सांगितले की अमिताभ बच्चन यांनी दोन खात्यांच्या माध्यमातून कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. एका खात्यात अमिताभ बच्चनचे नाव आहे, ज्यात दीड लाख डॉलर्स होते आणि अमिताभ आणि अभिषेकचे संयुक्त खात्यात एक लाख डॉलर्स होते. लॉन्गफिन कॉर्पने असा दावा केला आहे की निर्यातदार आणि आयातदार झिडु नाणे बीटकॉईनमध्ये रूपांतरित करतात. मग तो एक कार्यशील कॅपिटलसारखा वापरला जातो.

Leave a Comment