जिओ टीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंग सर्व्हिसचे वेब व्हर्जन लॉन्च


रिलायन्स जिओ युजर्ससाठी नवनव्या ऑफर्स सादर केल्यानंतर कंपनीने आता जिओ टीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंग सर्व्हिसचे वेब व्हर्जन लॉन्च केले आहे. युजर्स आता या सुविधेचा लाभ घेत वेब ब्राऊझर्सच्या माध्यमातून लाईव्ह टीव्ही शो पाहू शकतात. गेल्या अनेक दिवसांपासून युझर्सकडून जिओ टीव्हीच्या वेब व्हर्जनची मागणी केली जात होती. ती अखेर पूर्ण झाल्याने युजर्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.

केवळ जिओच्या युजर्ससाठीच ही सुविधा असून युजर्सच्या जिओने या मागणीला पूर्ण करण्यासाठी जिओ टीव्हीचे वेब व्हर्जन लॉन्च केले आहे. तुम्ही जर जिओ युजर्स असाल कर कोणत्याही ब्राऊजर मध्ये जावून https://jiotv.com/ लॉगईन केल्यावर हे पाहता येणार आहे. युजर्सला जिओ टीव्हीच्या वेब व्हर्जनमध्ये जिओ टीव्ही अॅपमध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टी आणि ठराविक टीव्ही चॅनल्स पाहता येतील. जिओ टीव्हीमध्ये एंटरटेनमेंट, मुव्ही, न्यूज आणि स्पोर्ट्स असे सर्व चॅनल्स आहेत.

तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीची भाषा निवडून त्या भाषेतील कार्यक्रम पाहू शकता. विशिष्ट चॅनेलचा मागील सात दिवसातील कंटेंटही यामध्ये दिसू शकेल. जिओ टीव्ही किंवा जिओ सिनेमा वेबवर पाहण्यासाठी तुम्हाला jiotv.com किंवा jiocinema.com वर लॉगईन करावे लागेल. तुम्हाला या सुविधेचा लाभ घेण्यासाठी एक युजर आयडी आणि पासवर्ड लागेल. याशिवाय यामध्ये तुम्हाला एचडी चॅनल नको असेल तर त्यासाठी विशेष फिल्टर सुविधाही देण्यात आली आहे.

Leave a Comment