आपल्या यूजर्ससाठी आणखी एक नवीन पर्याय सोशल मीडियामध्ये सर्वात प्रसिद्ध असलेल्या आणि अतिशय कमी कालावधीत प्रसिद्ध झालेल्या फेसबुकने उपलब्ध करुन दिला असून कंपनी सातत्याने ग्राहकांचा वापर जास्तीत जास्त सोपा व्हावा यादृष्टीने प्रयत्नशील असल्याचे दिसते.
फेसबुकने उपलब्ध करून दिला ‘स्नूझ’चा पर्याय
फेसबुकने नुकतेच ‘स्नूझ’ हा नवा पर्याय युझर्ससाठी आणला आहे. सुमारे दोन बिलियन ग्राहकांना या पर्यायामुळे नको असलेल्या पेज, मित्रांकडील नोटिफिकेशन्स बंद करता येणार आहेत. तुम्हाला यापूर्वी जसे आपण लोकांना ब्लॉक करायचो तसे ब्लॉक आता करण्याची गरज भासणार नाही. तुम्ही ३० दिवसांसाठी यामध्ये नको असलेली नोटिफिकेशन दूर ठेवू शकणार आहात. आता यामुळे आपल्याला कोणालाही अनफॉलो करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ३० दिवसांसाठी या मित्राला दूर ठेवू शकता.
हा पर्याय आता नेमका आहे तरी कुठे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर कोणत्याही पोस्टच्या उजव्या बाजूला तीन डॉटस असतात. त्यावर क्लिक केल्यावर डाऊन ऑप्शनमध्ये ‘स्नूझ’ हा पर्याय तुम्हाला दिसेल. तुम्ही यावर क्लिक केल्यानंतर त्या व्यक्ती, पेज, ग्रुप यांच्या मेसेजपासून सुटका मिळवू शकता. म्हणजेच तुम्हाला तुमच्या वॉलवर त्या व्यक्तीचे किंवा ग्रुपचे मेसेज दिसणार नाहीत.