हुंदाईची ‘ही’ कार बनली भारताची कार ऑफ द इयर


नवी दिल्ली : नव्या हुंदाई वर्ना या गाडीला २०१८या वर्षासाठी ‘इंडियन कार ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी निवडण्यात आले असून हा पुरस्कार भारतातील ऑटोमोबईल क्षेत्रात प्रतिष्ठित पुरस्कारांमधील एक समजला जातो.

होंडा डब्लू-व्ही, जीप कंपास,मारूती डिझायर,मारूती इग्निस, रेनो कॅप्टर,स्कोडा कोडिएक, टाटा नेक्सन आणि फॉक्स वेगन या कारचा या पुरस्काराच्या शर्यतीत समावेश होता . ११८ पॉइंट हुंदाई वर्नाला मिळाले तर मारूती डिझायरला ११७ पॉइंट आणि ८७ पॉइंट जीप कंपासला मिळाले आहेत. हुंदाई वर्ना ही मिड साइाज सेडान प्रकारातील कार असून ती होंडा सिटी आणि मारूती सियाज या कारशी बरोबरी साधते.नव्या कारमध्ये कंपनीने डिझाइनला अपडेट केले आहे. कारचा प्रोजेक्टर हेडलँप आणि एलईडी डीआरएल देण्यात आला आहे. यात १६ इंचाचे डायमंड कट एलॉय व्हील बसवण्यात आले आहेत.

Leave a Comment