लुंगीला भारतातील सर्वाधिक पुरुषांची पसंती


नवी दिल्ली : राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने नुकतीच एक आकडेवारी जारी केली असून त्यात भारतातील सर्वाधिक पुरुषांनी जीन्स-टी शर्ट नाही, सदरा-लेंगा नाही, तर लुंगीला पसंती दिली आहे.

लुंगीला भारतीय पुरुष सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचे समोर आल्यानंतर धोतर आणि कुर्ता-पायजम्याचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षभरात एक लुंगी विकत घेतल्याचे एक लाख नागरिकांसोबत केलेल्या सर्व्हेत ५२ टक्के जणांनी सांगितले. तर २० टक्के जणांनी धोतर तर १३ टक्के लोकांनी पायजमा खरेदी केल्याचे सांगितले. भारतात दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये लुंगी आणि धोतर हा पेहराव प्रामुख्याने केला जातो. कुर्ता आणि पायजमा या पेहरावाला उत्तरेकडील राज्यांनी पसंती दिली.

ओदिशाचा लुंगी परिधान करणाऱ्या राज्यांमध्ये पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, तामिळनाडू यांचा नंबर लागतो. कुर्ता-पायजमा घालणाऱ्यांमध्ये हरियाणा-दिल्ली ही राज्य अव्वल आहेत.

Leave a Comment