
जीबी मोबाईल्स कंपनीने भारतात पहिलाच असा फोन सादर केला आहे जो फोरजी तर आहेच पण यात टच स्क्रीन व कीपॅड अशा दोन्ही सुविधा युजरला मिळू शकणार आहेत. रेव्होल्यशन टीएसटी ३ या नावाने आलेल्या या फोनची किंमत कुणालाही सहज परवडणारी म्हणजे अवघी ३९९९ रूपये आहे. हा फोन जग बदलेल असा दावा कंपनीने केला आहे.
टचस्क्रीन, कीपॅड सुविधा देणारा रेव्होल्युशन टीएसटी ३ सादर
हा फोन मॉर्डन आहे तसाच स्टायलीशही आहे. भारतात आजही ६० टक्के जनता फिचर फोन वापरते. त्यांना स्मार्टफोनवर अपग्रेड करण्यासाठी हा नवा फोन फारच उपयुक्त असल्याचे व त्याच उद्देशाने तो सादर केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या फोनमध्ये टचस्क्रीन वापरता येणार आहे तसेच गरज असेल त्यांना की पॅडचा वापरही करता येणार आहे. यात २२ प्रादेशिक भाषा वापरता येतात. या फोनला ४ इंची स्क्रीन दिला गेला आहे तसे फिंगरप्रिंट सेन्सर ही आहे.फोनला २२०० एएएचची बॅटरी दिली गेली आहे. इच्छुकाना या फोनवर टचस्क्रीनचा अनुभव अद्भूत वाटेलच पण फिचर फोनमधील कीपॅडचा आनंदही घेता येणार आहे.
